जबलपूर - सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दहशतीखाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही काही जणांना मात्र आपल्या कर्तव्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. कॉन्स्टेबल आनंद पांडे यांनी आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तब्बल 450 किमी अंतर पायी कापले आहे. आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी कानपूर ते जबलपूर हा प्रवास पायी पूर्ण केला.
कोरोनाविरुद्धचा योद्धा.. तब्बल ४५० किलोमीटरची पायपीट करून पोलीस कॉन्स्टेबल कर्तव्यावर हजर
कानपूर शहरातील बहुती येथील रहिवासी असलेले आनंद पांडे हे जबलपूर येथे पोलीस कॉन्सेटबल म्हणून कार्यरत आहे.
कानपूर शहरातील बहुती येथील रहिवासी असलेले आनंद पांडे हे जबलपूर येथे पोलीस कॉन्सेटबल म्हणून कार्यरत आहे. त्यांची पत्नी आजारी असल्यामुळे ते 20 फेब्रुवारी रोजी सुट्टी घेऊन गावी गेले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले होेते. मात्र, नंतर त्यांना पुन्हा आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी रवाना व्हायचे होते. ते 30 मार्च रोजी कानपूरवरून पायीच जबलपूरकडे निघाले होते. 3 दिवसांनंतर ते जबलपूर येथे पोहोचले.
इन्स्पेक्टर एसपीएस बाघेल आणि ओमाटी पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आनंद पांडेच यांच्या कर्तव्यनिष्ठेची प्रशंसा केली. सध्या आनंद पांडे हे घंटाघर चौक, जबलपूर येथे लॉकडाऊन दरम्यान आपले कर्तव्य पार पाडत आहेत.