मध्य प्रदेशात काँग्रेस २३ जागा जिंकेल, मुख्यमंत्री कमलनाथांचा दावा - mp
'मागील ८५ दिवसांत आम्ही काय केले आहे, हे लोकांना सांगणार आहे. भाजप सरकारने मध्य प्रदेशच्या लोकांना नाराज केले आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंह कोठून निवडणूक लढवणार आहेत, असे विचारले असता त्यांनी 'ते स्वतःच याबाबत निर्णय घेतील,' असे सांगितले.
छिंदवाडा - मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी काँग्रेस मध्य प्रदेशातील २९ पैकी २३ जागा जिंकेल, असे म्हटले आहे. 'आम्ही लोकसभा निवडणुकांमध्ये किमान २३ जागा जिंकू,' असा दावा कमलनाथ यांनी केला आहे. काँग्रेसने अद्याप मध्य प्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसला २०१४ च्या निवडणुकांमध्ये २९ पैकी केवळ ३ जागा मिळाल्या होत्या.
'मागील ८५ दिवसांत आम्ही काय केले आहे, हे लोकांना सांगणार आहे. भाजप सरकारने मध्य प्रदेशच्या लोकांना नाराज केले आहे,' असे त्यांनी म्हटले आहे. दिग्विजय सिंह कोठून निवडणूक लढवणार आहेत, असे विचारले असता त्यांनी 'ते स्वतःच याबाबत निर्णय घेतील,' असे सांगितले. 'आम्ही मागील ३०-३५ वर्षांपासून आम्ही एका जागेवर पराभूत होत आहोत. त्या जागेवर दिग्विजय सिंह यांनी निवडणूक लढवावी, असे आमचे मत आहे,' असे ते पुढे म्हणाले.
'विधानसभा निवडणुकांनंतर राज्य सरकारने अंदाजे २२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. ही प्रक्रिया निवडणुकीनंतर पूर्ण केली जाईल,' असे ते म्हणाले. कमलनाथ तब्बल ९ वेळा लोखसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी २०१४ आधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.