नवी दिल्ली - मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही. काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी हे पद मिळवण्यासाठी संघर्ष केला पण हे होऊ शकले नाही. यंदाच्या निवडणुकीतही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठीच्या अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे यंदाही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला मिळाल्या ५२ जागा, लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळेल का ? हा आहे नियम.. - opposition
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागाच जिंकता आल्या. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोदी सरकारकडे विनंती देखिल केली, मात्र हे शक्य झाले नाही.
विरोधा पक्षनेता होण्याचे नियम..
लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी १० टक्के जागा मिळवण्याची आवश्यकता असते. लोकसभेत एकूण जागा ५४३ आहेत. याच्या १० टक्के जागा म्हणजे ५५ जागा जिंकणे गरजेचे आहे. मात्र, काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या. फक्त ३ जागा कमी पडत असल्यामुळे यंदाच्या लोकसभेतही काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदापासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ४४ जागाच जिंकता आल्या. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मोदी सरकारकडे विनंती देखिल केली, मात्र हे शक्य झाले नाही. मागील लोकसभेत काँग्रेसचा आवाज म्हणून खर्गे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी त्यांची भूमिका चांगल्या पध्दतीने निभावली. २०१९ च्या निवडणुकीत ते गुलबर्गा येथून पराभूत झाले. त्यामुळे आता काँग्रेस गटनेता म्हणून कुणाची निवड करतात की राहूल गांधी स्वत:च ही जबाबदारी सांभाळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.