नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदींच्या फिट इंडिया या कार्यक्रमावर हल्लाबोल केला आहे. 'अर्थव्यवस्थेचे अर्थ बिघडले, रुपया कंगाल झालाय, व्यवसाय सारे बंद झाले, ही मोदींची कमाल', असे काँग्रेसने टि्वट केले असून यात एक व्हिडिओही शेअर केला आहे.
आरबीआयला लुटल्यानंतर सरकारने करदात्यांना इतके तरी सांगायला हवे की, त्यांच्या पैशाचा कुठे आणि कसा उपयोग केला जाणार आहे. दुर्दैवाने सरकारचे पारदर्शी होणे हे भाजपला अर्थव्यवस्था सुधारण्यास सांगण्यासारखे असून या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत, असे टि्वट काँग्रेसने केले आहे.
'रुपया झाला बेहाल, पाहा साहेबांचा कमाल, रुपया खाली, साहेब वरती, परिस्थिती झाली खराब, या आशयाचे टि्वट काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत टि्वटरवर शेअर केले आहे.