नवी दिल्ली - उत्तरप्रदेश काँग्रेसच्या महासचिवांद्वारे जिल्हा कमिटी बरखास्त करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेस कमिटीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. कर्नाटकनंतर काँग्रेसने उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्हा कमिटींना बरखास्त केले आहे.
उत्तरप्रदेश मधील काँग्रेसच्या सर्व जिल्हा कमिटी बरखास्त - अजय कुमार लल्लु
कर्नाटकनंतर काँग्रेसने उत्तरप्रदेशमधील सर्व जिल्हा कमिटींना बरखास्त केले आहे.
काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी याबाबत माहिती दिली. माहितीनुसार काँग्रेस आमदार अजय कुमार लल्लु यांना पूर्व उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या संघटना फेरबदलासाठी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पश्चिम उत्तरप्रदेशचा प्रभारी अजून नियुक्त करण्यात आला नाही.
याव्यतिरिक्त काँग्रेस कमिटीकडून उत्तरप्रदेश पूर्व आणि पश्चिम भागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी २ व्यक्तींच्या गटाला मंजुरी देण्यात आली आहे. हे गट निवडणुकीचे काम पाहणार आहेत.