महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशात घोडेबाजाराचा उदय, सुरजेवालांची टीका - pm modi

'कर्नाटकात घोडेबाजार जोरात सुरू आहे. आमदार खरेदीची मोहीम भाजपने राबवली आहे,' अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे. त्यांनी मोदी यांचा अर्थ ‘Mischievously Orchestrated Defections in India (MODI)’ असा सांगितला आहे.

रणदीप सुरजेवाला

By

Published : Jul 7, 2019, 12:00 AM IST

नवी दिल्ली - भाजप पैशाच्या जोरावर कर्नाटकात सत्ता उलटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सुरजेवाला यांनी भाजपवर टीका केली आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांना भाजप खरेदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी मोदी यांचा अर्थ ‘Mischievously Orchestrated Defections in India (MODI)’ असा सांगितला आहे.

यावेळी बोलताना सुरजेवाला यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 'रक्षकच भक्षक झाले आहेत. लोकशाही पायदळी तुडवत आहेत. मग देशाचे कसे होणार आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, हे भाजपच्या पचनी पडत नाही. त्यामुळे कर्नाटकात घोडेबाजार जोरात सुरू आहे. आमदार खरेदीची मोहीम भाजपने राबवली आहे,' अशी टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांच्याविरोधात राजीनामास्त्र उपसले आहे. याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ही राजकीय अस्थिरता उद्भवण्यामागे भाजप असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकातील सरकार आपोआप कोसळेल. त्यासाठी भाजप काहीही करणार नाही. मात्र, आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू करेल. मात्र, ही बंडाळी उफाळण्यामागे या आमदारांची राजकीय महत्वकांक्षा असण्याचीही शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर आमदारांनी थेट मुंबई गाठली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details