महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 15, 2020, 7:58 AM IST

ETV Bharat / bharat

मोदींच्या 7 नियमांवर काँग्रेसने उपस्थित केले 'हे' 7 प्रश्न

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींच्या या सात नियमांवर सात प्रश्न उपस्थित केले आहेत. 'बर्‍याच चर्चा झाल्या पण कोरोनाशी लढण्यासाठी रोडमॅप काय आहे', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. यावेळी मोदी यांनी नागरिकांना सात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींच्या या सात नियमांवर सात प्रश्न उपस्थित केले आहेत. 'बर्‍याच चर्चा झाल्या पण कोरोनाशी लढण्यासाठी रोडमॅप काय आहे', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोदींच्या सात नियमांवर काँग्रेसचे सात प्रश्न...

  1. कोरोना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चाचणी करणे. 1 फेब्रुवारी ते 13 एप्रिल 2020 पर्यंत म्हणजेच 72 दिवसात देशात केवळ 2,17,554 कोरोना चाचण्या झाल्या. दररोज सरासरी 3,021 चाचण्या होतात. चाचणी अनेक पटीने वाढवण्यासाठी काय योजना आहे?
  2. कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर, परिचारीका,आरोग्य कर्मचारी,पोलीस, सफाई कर्मचारी यांच्याकडे एन -95 मास्कची आणि सुरक्षा उपकरणाची कमतरता आहे. हे कधी उपलब्ध होईल.
  3. लाखो स्थलांतरित कामगार आज संकटाशी झगडत आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे काय कृती योजना आहे.
  4. कोट्यवधी एकर गहू व रब्बी पिके कापणीस तयार आहेत, पण त्याची व्यवस्था नाही. पिकांची हमी देण्याबाबत तुम्ही गप्प का आहात?
  5. कोरोनाच्यापूर्वीपासून देशातील तरुण बेरोजगार होते. आता लॉकडाऊनमुळे लहान नोकऱयाही जात आहेत. यावर तुमची काय उपाययोजना आहे. लॉकडाऊननंतर कोट्यावधी तरुण काय करतील.
  6. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार हे दुकानदार, लघु व मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे ते कोसळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीनंतर जास्तीत जास्त रोजगार या भागात आहे. मग त्यांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्याची सरकारची कृती योजना काय आहे?
  7. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जगाने कोट्यवधी आणि अब्जावधी रुपयांची आर्थिक पॅकेजेस लागू केली आहेत. आपले सरकार या यादीतील शेवटच्या स्थानावर का आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details