महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

योगी सरकार बधीर झालेय; त्यामुळे उत्तर प्रदेशात गुन्हेगार मोकाट - प्रियांका गांधी - priyanka gandhi

'उत्तर प्रदेशात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांना हवे ते करत आहेत. गुन्हे घडतच आहेत. मात्र, सरकार बधीर झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर शरणागती पत्करली आहे का?' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

प्रियांका गांधी

By

Published : Jun 29, 2019, 8:29 PM IST

लखनौ - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर शनिवारी हल्ला चढवला. यौगी सरकारच्या कारकीर्दीत उत्तर प्रदेशात गुन्हेगार मोकाट फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर शरणागती पत्करली आहे का,' असा सवाल त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.

'उत्तर प्रदेशात गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यांना हवे ते करत आहेत. गुन्हे घडतच आहेत. मात्र, सरकार बधीर झाले आहे. त्यांना यामुळे काहीच फरक पडत नाही. उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगारांसमोर शरणागती पत्करली आहे का?' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.

याआधी समाजवादी पक्षानेही याच कारणावरून भाजपवर हल्ला चढवला होता. भाजप सरकारच्या कारकीर्दीत गुन्ह्यांमध्ये मोठी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details