नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात आले आहे. यावेळी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचली.
काँग्रेसचे राजघाटावर धरणे; सोनियांसह राहुल गांधी उपस्थित - CONGRESS protest against CAA
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून सोमवारी दिल्ली स्थित राजघाटावर धरणे करण्यात आले आहे.
काँग्रेसचे राजघाटावर धरणे
14 डिंसेबरला रामलीला मैदानावर काँग्रेसच्या वतीने 'भारत बचाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसकडून पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर ला देशभरामध्ये ‘संविधान बचाओ- भारत बचाओ’ मोर्चा काढण्यात येणार आहे.