नवी दिल्ली - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी रविवारी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाच्या एका आमदार आणि त्याच्या मुलाने एका आरोपीला पोलीस कोठडीतून घेऊन गेले. या आरोपीला एका महिलेसोबत छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुन 'गुन्हेगारांना वाचवा' हे राज्य व्यवस्थेचे ध्येय आहे, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.
याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी एका माध्यमांनी दिलेला अहवालही दिला. त्यात दिले आहे की, भाजपा आमदाराने आपल्या मुलासोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच एका महिलेवर छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यातून घेऊन गेले. यावरुन 'बेटी बचाओ' अभियानाची सुरुवात कशी झाली? यातून 'अपराधी बचाव' हे कुठे चालले आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.