महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टीका करण्याच्या नादात दिग्विजय सिंहांनी पुलवामा हल्ल्याला म्हटले 'अपघात' - digvijay singh

दोन दिवसांपूर्वी सिंह यांनी अमेरिकेप्रमाणे भारतानेही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत, असा खोचक सल्ला दिला होता. मात्र, सरकारला जाब विचारण्याच्या नादात त्यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्याला 'पुलवामा दुर्घटना' म्हणजे 'अपघात' असे संबोधले आहे.

दिग्विजय सिंह

By

Published : Mar 5, 2019, 2:16 PM IST

नवी दिल्ली - भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविरुद्ध पाकिस्तानच्या भूमीवर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावर विदेशी मीडियाने शंका उपस्थित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर टीकेची मोहीम उघडली आहे. मात्र, टीका करण्याच्या नादात काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ल्याला एका ट्विटमध्ये 'अपघात' असे संबोधले आहे. यामुळे त्यांना सोशल मीडियावर टीकेचे धनी व्हावे लागले.

दोन दिवसांपूर्वी सिंह यांनी अमेरिकेप्रमाणे भारतानेही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे द्यावेत, असा खोचक सल्ला दिला होता. त्यांनी सरकारमधील वेगवेगळे मंत्री या स्ट्राईकमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा वेगवेगळा आकडा सांगत आहेत. काही मंत्री ३०० म्हणतात. भाजप अध्यक्ष अमित शाह २५० म्हणतात. योगी आदित्यनाथ ४०० ठार झाल्याचे सांगतात. एस. एस. अहलुवालिया यांनी एकही मारला गेला नसल्याचे म्हटले आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्यापैकी खोटारडा कोण आहे,' असे त्यांनी आज विचारले आहे. मात्र, सरकारला जाब विचारण्याच्या नादात त्यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्याला 'पुलवामा दुर्घटना' म्हणजे 'अपघात' असे संबोधले आहे.

सिंह यांच्या या ट्विटवर 'तुमचा जन्मही अपघातच होता, तुम्ही देशासाठी एक अपघात आहात, यांनीच लादेननिषयी 'लादेन जी' असे म्हटले होते' अशी ट्विटस सध्या सिंह यांचा जोरदार समाचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details