महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कॉँग्रेसने सुरू केली 'स्पीक अप इंडिया' मोहीम, केंद्र सरकारसमोर चार मागण्यांचा प्रस्ताव - राहुल गांधी

कोरोनाचा सर्वात जास्त फटका गरिबांना बसला आहे. अन्नपाण्याशिवाय हे लोक घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत आहेत. देशातील लोकांना कर्ज नाही तर पैसा हवाय, असे राहुल गांधी म्हणाले.

congress
कॉँग्रेसने सुरू केली 'स्पिक अप इंडिया' मोहिम

By

Published : May 29, 2020, 10:13 AM IST

नवी दिल्ली- कोरोना लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि स्थलांतरित मजुरांना भेडसावणार्‍या आर्थिक समस्यांकडे लक्ष देण्यासाठी कॉंग्रेसने गुरुवारी 'स्पीक अप इंडिया' ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. आपल्या सोशल मीडिया मोहिमेत कॉंग्रेसने केंद्र सरकारपुढे चार मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये पुढील ६ महिन्यांसाठी गरिबांच्या खात्यात ७,५००० रुपये जमा करण्याची मागणी केली आहे. तसेच त्वरित मदत म्हणून १० हजार रुपये देण्याची मागणी केली आहे.

तसेच मनरेगा अंतर्गत मजुरांना २०० दिवस काम देण्याची मागणी केली आहे. चालत जाणार्‍या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याची मागणी केली.

कोरोनाचा सर्वात जास्त फटका गरिबांना बसला आहे. अन्नपाण्याशिवाय हे लोक घरी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत आहेत. देशातील लोकांना कर्ज नाही तर पैसा हवाय, असे राहुल गांधी म्हणाले.

प्रियंका गांधींनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. या संकटकाळात सर्व राजकीय पक्षांनी वैयक्तिक हेवेदावे आणि विचारसरणी बाजुला ठेवून गरिब आणि गरजुंना मदत करायला हवी, असे त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेश सरकारने आमच्या हजार बसेसला परवानगी नाकारली. आम्ही योगी सरकारला त्यांच्या पक्षाचे बॅनर लावण्याचीदेखील मुभा दिली होती. त्यांनी १२,००० बसेस चालवण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण केले नाही. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोरोनाविरोधात लढत आहे, तर भाजप त्यांच्यावर आरोप लावून सरकार उधळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details