नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवरून त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली. तत्पूर्वी मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
राजीनामासत्र : राहुल गांधींच्या पाठोपाठ ज्योतिरादित्य सिंधिया यांचाही राजीनामा - resign
'जनतेचा निर्णय मान्य करत मी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि पक्षासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल गांधींचे आभार मानतो,' असे सिंधिया यांनी म्हटले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया
'जनतेचा निर्णय मान्य करत मी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. मी माझ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदाचा राजीनामा राहुल गांधींकडे सोपवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि पक्षासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,' असे सिंधिया यांनी म्हटले आहे.