महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसने यूपीमध्ये भाजपची मते फोडणारे उमेदवार दिलेत - प्रियांका गांधी - loksabha election 2019

'आम्ही अनेक जागांवर भाजपला तगडे आव्हान दिले आहे. तर, जिथे आमचे उमेदवार कमकुवत आहेत, ते असे आहेत, ज्यामुळे भाजपची मते फोडली जातील,' असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी

By

Published : May 1, 2019, 4:59 PM IST

रायबरेली - 'उत्तर प्रदेशात भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसने भाजपची मते फोडणारे उमेदवार उभे केले आहेत,' असे काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी रायबरेलीत म्हटले आहे. भाजपला उत्तर प्रदेशात मोठा झटका बसेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


'आम्ही अनेक जागांवर भजपला तगडे आव्हान दिले आहे. तर, जिथे आमचे उमेदवार कमकुवत आहेत, ते असे आहेत, ज्यामुळे भाजपची मते फोडली जातील,' असे प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका सध्या रायबरेलीत प्रचार करत आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्या पक्षाध्यक्ष राहुल गांधींचा मतदार संघ अमेठी येथेही मते मिळवण्यासाठी जनसंपर्क करत आहेत. त्यांनी यूपीतील अनेक शहरांमध्ये रोड शो केले आहेत. रायबरेली आणि अमेठीमध्ये ६ मे रोजी मतदान होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details