महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'पंतप्रधान मोदींनी देशाला धोका दिला', काँग्रेसची केंद्र सरकावर टीका

सध्या भारतीय नागरिकांना त्यांच्या गरजा पुरवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. तब्बल 5 वेळा भारतीय नागरिकांच्या गरजा पुरवण्यामध्ये पंतप्रधान मोदींना अपयश आले आहे, असे काँग्रेसने दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

file pic
सोेनिया गांधी संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 9, 2020, 9:10 PM IST

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे नागरिकांचे हाल झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. देश कठीण परिस्थितीमधून जात आहे. मात्र, केंद्र सरकारचे सर्व लक्ष प्रचार करण्यावर आहे, असे काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे.

'देश कोरोना संकटामध्ये आहे. मात्र, केंद्र सरकाराचा सर्व भर प्रचारावर सुरू आहे. पूर्वनियोजीत लॉकडाऊन न केल्यामुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या बेरोजगार युवकांवरही सरकारने लक्ष द्यायाला हवे', असे काँग्रेसने टि्वटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला धोका दिला, हा हॅशटॅगही त्यांनी तयार केला आहे.

सध्या भारतीय नागरिकांच्या गरजा पुरवणाऱ्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. तब्बल 5 वेळा भारतीय नागरिकांच्या गरजा पुरवण्यामध्ये पंतप्रधान मोदींना अपयश आले आहे, असे काँग्रेसने दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून कोरोना विरोधात लढण्यासाठी पर्याय सुचविले आहेत.

दरम्यान भारतामध्ये आत्तापर्यंत कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात 549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 166 जण दगावले आहेत. केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू राज्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details