नवी दिल्ली - लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चिनी सैन्यातील संघर्षादरम्यान भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. भारत-चीन तणावावरुन केंद्र सरकारला विरोधी पक्षाकडून लक्ष्य केले जात आहे. आज सर्वपक्षीय दलाच्या बैठकीपूर्वीच काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकावर टीका केली. सीमेवर सैनिकांवर हल्ले होत असतील तर आत्मरक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रोटोकॉलचे महत्त्व राहत नाही, असे सिब्बल म्हणाले.
'सैनिकांवर हल्ला झाल्यास कोणताही प्रोटोकॉल महत्त्वाचा नाही'
भारत-चीन तणावावरुन केंद्र सरकारला विरोधी पक्षाकडून लक्ष्य केले जात आहे. आज सर्वपक्षीय दलाच्या बैठकीपूर्वीच काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकावर टीका केली. सिमेवर सैनिकांवर हल्ले होत असतील तर आत्मरक्षणासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रोटोकॉलचे महत्त्व राहत नाही, असे सिब्बल म्हणाले.
विनाशस्त्र असणाऱ्या सैनिकांना गलवान खोऱ्यात कोणी पाठवले? याला जबाबदार कोण?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय जवान निशस्त्र गेल्याचा दावा फेटाळला आणि गलवान खोऱ्यात 15 जून रोजी भारतीय सेनाचा एकही जवान निशस्त्र नव्हता, असे सांगितले. तसेच भारतातील प्रत्येक सैनिकाकडे पुरेशी हत्यारं होती. मात्र एका करारानुसार गलवान घाटीत शस्त्रांचा वापर करू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
सीमेवर कर्तव्यावर असलेल्या सैनिकांकडे नेहमी हत्यारे असतात. विशेष करुन पोस्टवरुन निघताना त्यांच्याकडे शस्त्र असते. मात्र, जेव्हा दोन देशांदरम्यान फक्त तणाव असतो. तेव्हा शस्त्रांचा वापर न करण्याची मोठी ही 1996 आणि 2005 च्या करारानुसार राहिली आहे, असे राहुल गांधी यांची पोस्ट रिट्विट करीत जयशंकर यांनी सांगितले.