महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

३० लाख खर्चुन बांधलेल्या निवासी इमारतीची दुरवस्था; सरकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली इमारत - government doctors

३० लाख रुपये खर्चुन बांधलेल्या निवासी इमारतीची वापराविना दुरवस्था झाली आहे. ही इमारत सरकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधली होती. पण याठिकाणी कोणीच राहायला आले नाही.

सरकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली इमारत

By

Published : Jul 22, 2019, 2:11 PM IST

छतरपूर (मध्यप्रदेश)- जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. जिल्ह्याच्या राजनगर भागांतर्गत कर्रीमध्ये ३० लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्राच्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधली होती. या इमारतीची वापराविना दुरवस्था झाली आहे. सरकारी आदेश असूनही आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स येथे राहण्यासाठी आले नाहीत. ते येथे आलेही नाही आणि त्यांनी कधी या घरांचे दारही उघडले नाही. या इमारतीची देखरेख ठेवली नसल्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे.

सरकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी बांधलेली इमारत
यामुळे ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा देता यावी, यासाठी या इमारतीचे निर्माण सरकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले. झाला प्रकार गंभीर असून, या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणात येईल, असे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details