महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मत्स्य उद्योगाला कोरोनापासून वाचविण्यासाठी ICARने जारी केली नियमावली - कोरोना आणि मासेमारी बातमी

नद्या, खाडीप्रदेश, तलाव, पाणथळ प्रदेशात मासेमारी करणाऱ्यांनी कोरोनापासून बचाव कसा करावा. मत्स्यपालन आणि संबधीत क्षेत्रांना कोरोना धोक्याची माहिती यावद्वारे देण्यात आली आहे.

FISHERMAN
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 7, 2020, 7:07 PM IST

नवी दिल्ली - इंडियन कौन्सिल ऑफ अ‌ॅग्रिकल्चर रिसर्च (ICAR) संस्थेने गुरुवारी मत्स्य व्यवसायाशी संबधित उद्योग आणि मच्छिमारांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. हिंदी, इंग्रजी वगळून इतर १० स्थानिक भाषेत ही नियमावली तयार केली आहे. या क्षेत्राशी संबधीत कर्मचारी, व्यवसायिक, मासेमारी करणाऱ्यांनी कोरोना संसर्ग कसा टाळावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील बराकपोर येथील केंद्रीय अंतर्गत मासेमारी संशोधन संस्थेने (ICAR-CIFRI) ही नियमावली जारी केली आहे. नद्या, खाडीप्रदेश, तलाव, पाणथळ प्रदेशात मासेमारी करणाऱ्यांनी कोरोनापासून बचाव कसा करावा. मत्स्यपालन आणि संबधीत क्षेत्रांना कोरोना धोक्याची माहिती यावद्वारे देण्यात आली आहे.

कोरोना महामारीमुळे मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे आयसीएआर या क्षेत्रातील अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मत्स्य विभागाने तयार केलेली मासेमारी विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details