महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील टोल वसूली तात्पुरती बंद, अत्यावश्यक सेवेत अडथळा नको.. - covid-19

गडकरी यांनी ट्विट करत सांगितले, की कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर, देशभरातील सर्व टोल प्लाझांवरील टोल घेणे तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात येत आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना येणारी अडचण कमी होईल. तसेच, त्यांना लागणारा वेळही वाचेल.

collection of tolls suspended temporarily across country
देशभरातील टोल वसूली तात्पुरती बंद, गडकरींची घोषणा..

By

Published : Mar 26, 2020, 9:33 AM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल बंद करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.

गडकरी यांनी ट्विट करत सांगितले, की कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर, देशभरातील सर्व टोल प्लाझांवरील टोल घेणे तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात येत आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना येणारी अडचण कमी होईल. तसेच, त्यांना लागणारा वेळही वाचेल.

यासोबत, टोल घेणे बंद असले तरी रस्त्यांच्या देखभालीचे काम आणि टोल नाक्यांवरील अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी २१ दिवसांसाठी देश लॉकडाऊन केला आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सहाशेहून अधिक झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details