महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विमानात 'कोरोना'बाधित प्रवासी..! वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली

जगात सध्या कोरोनाची दहशत आहे. देशातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, कोरोनाविषयी लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज असल्याचे दिसून येत आहे.

Indira Gandhi International Airport Delhi
विमान

By

Published : Mar 23, 2020, 12:35 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याहून दिल्लीला पोहचलेल्या एका विमानात कोरोनाबाधीत प्रवासी असल्याची माहीती प्रवाशांना मिळाली. त्यामुळे घाबरलेल्या वैमानिकाने चक्क विमानाच्या खिडकीतून उडी मारली आहे.

वैमानिकाने चक्क खिडकीतून मारली उडी....

हेही वाचा...केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री अन् विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला टाळ्या-थाळ्यांचा गजर

एअर एशिया विमानात होता संदिग्ध प्रवासी...

पुणे ते दिल्ली एअर एशियाच्या विमानात हा संशयित प्रवासी होता. दिल्ली विमान पोहोचताच प्रवाशांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यातच वैमानिकाला याची खबर लागताच त्याने बसलेल्या जागी शेजारी असलेल्या खिडकीतून उडी मारली.

संशयिताचा चाचणी अहवाल निगेटिव्ह...

या घटनेनंतर या विमानाला रन वे वर वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. तसेच सगळ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या प्रवाशामुळे एकूण गोंधळ उडाला होता, त्या प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details