नवी दिल्ली - नैसर्गिक वायुच्या किंमती घसरल्यामुळे वाहनांमध्ये वापरला जाणारा सीएनजी आणि घरगुती वापरात असलेल्या एलपीजीच्या 7 टक्क्यांनी किंमती कमी झाल्या आहेत. नवी दिल्ली आणि जवळच्या भागांमध्ये सीएनजी आणि घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने गॅसच्या दरात 3 रुपये 20 पैसे कमी करुन 42 रुपयांपर्यंत आणली आहे.
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथे ही कपात 3 रुपये 60 पैसे करून दर 47 रुपये 75 पैसे करण्यात आल्याची इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्यावतीने देण्यात आली आहे. दिल्लीतील पाईपद्वारे घरगुती गॅस जोडण्यांसाठी 1 रुपये 55 पैसे कमी करुन तो 28 रुपये 55 पैसे प्रती स्टॅंडर्ड क्युबिक मीटर करण्यात आल आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथे पाईपद्वारे घरगुती गॅस जोडण्यांसाठी 1 रुपये 65 पैसे कमी करुन 28 रुपये 45 पैसे प्रती स्टॅंडर्ड क्युबिक मीटर करण्यात आला आहे, ती यापूर्वी 30 रुपये 10 पैसे होती.
सहा महिन्यात दुसऱ्यांदा गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात सीएनजीची किंमत 1 रुपये 90 पैसे तर नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये 2 रुपये 15 पैसे इतकी कपात करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीतील पाईपद्वारे घरगुती गॅस जोडण्यांसाठी 90 पैसे कमी प्रती स्टॅंडर्ड क्युबिक मीटरसाठी कमी करण्यात आल आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथे पाईपद्वारे घरगुती गॅस जोडण्यांसाठी 40 पैसे प्रती स्टॅंडर्ड क्युबिक मीटरसाठी कमी करण्यात आला होता.
नैसर्गिक वायूचे सीएनजीमध्ये रुपांतर करून ते पाईपद्वारे घरगुती स्टोव्हसाठी पुरवण्यात येतो. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये 56 रुपये 65 पैसे तर कर्नाळमध्ये 49 रुपये 85 पैसे तर रेवरी आणि गुरुग्राममध्ये 54 रुपये 15 पैसे प्रती किलो दर असेल, असे जाहीर केले आहे.
रेवरीमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या गॅसची किंमत प्रती स्टॅंडर्ड क्युबिक मीटर 28 रुपये 60 पैसे असेल ती 1 रुपये 55 पैशांनी कमी करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड दिल्लीत 9 लाख तर नोएडा, ग्रेटर नोए़डा आणि गाझियाबाद आणि गुरुग्राम येथील एकूण मिळून 4.5 लाख घरगुती गॅस जोडण्यांना गॅस पुरवते. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कॅशलेस पेमेंटवर सूट देते.