सीवान - बिहार विधानसभा निवडणुकांच्या दुसऱया टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ हे आज गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राजदवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने देशात दहशतवाद वाढवण्याचे काम केल्याचे योदी आदित्यनाथ म्हणाले. तसेच राजदने बिहारमधील बाहुबलींना मदत केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बिहार विकासाच्या दिशेने - आदित्यनाथ
दरम्यान, केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकार मिळून राज्यात चांगले काम करत आहेत. त्यामुळे बिहार हे विकासाच्या दिशेने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक विकासकामांच्या योजना राबवण्यात येत असून, याचा फायदा बिहारच्या नागरिकांना होणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.