अहमदाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहमदाबाद येथील मणीनगरमध्ये एका मराठी समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
राहुल गांधींचे भाषण म्हणजे टीव्ही मालिकेची स्क्रीप्ट, फडणवीसांची गुजरातमध्ये टीका - fadanvis
अहमदाबादेतील मणीनगरमध्ये एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस म्हणाले, राहुल गांधी आज देशामधील गरीबी दूर करण्याचे बोलत आहेत. पण हीच गोष्ट त्यांच्या आजी वडीलांनीही सांगितली होती. मात्र आजपर्यंत गरीबी दूर झाली नाही.
राहुल गांधी यांचे भाषण टीव्ही सिरियलमध्ये लिहीलेल्या एखाद्या स्क्रीप्टप्रमाणे असल्याची टीकादेखिल त्यांनी केली.