रायपूर- मोदी आणि शाहंमध्ये विवाद सुरू आहेत, ज्यामध्ये देश भरडला जातो आहे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. 'जनमत का सम्मान' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर सीएए, एनआरसी आणि पुलवामा प्रकरणावरून जोरदार टीका केली.
देशाच्या नागरिकांना आपले नागरिकत्व सिद्ध करायला सांगणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये या मुद्द्यांवर वाद सुरू आहेत. या वादांमुळे या दोघांच्यामध्ये आपला देश भरडला जातो आहे. नरेंद्र मोदी आधी म्हणत होते, की सीएएबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, अमित शाह म्हणत आहेत की यावर आधीपासूनच चर्चा सुरू होती. म्हणजेच यापैकी कोणीतरी एक खोटे बोलत आहे. या सरकारची मागील पाच वर्षे नरेंद्र मोदींची होती, तर आताचे सात-आठ महिने अमित शाह यांचे आहेत. या दोघांनी मिळून भारताच्या नागरिकांना इंग्रजी शिकवण्याचे काम केले आहे, अशा शब्दांमध्ये बघेल यांनी मोदी-शाहंवर टीका केली.