श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जम्मू काश्मीर : पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून नागरिकाची हत्या - जम्मू काश्मीर
पुलवामा जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली.
पुलवामा जिल्ह्यातील दादूरा-कंगन भागातील रहिवासी आझाद अहमद दारची राहत्या घरात गोळया घालून हत्या केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. रूग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. दहशवाद्यांशी त्यांना का लक्ष्य केले, याबाबत अद्याप माहिती नाही. लष्कराने संपूर्ण परिसर घेरला आहे. अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.