नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली येथे सीआयएसएफच्या जवानांनी जवळपास २१ किलो ड्रग्जसह विदेशी महिलेला अटक केली आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास २१ लाख रुपये आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशी महिलेकडून २१ किलो ड्रग्ज जप्त; सीआयएसएफची कारवाई - सीआयएसएफ
महिलेकडील बॅगमधील विविध पर्समध्ये ५०० ग्रॅम वजनाचे ड्रग्ज पॉलिथिन बॅगमध्ये लपवल्याचे आढळून आले. सर्व बॅगमधून जवळपास २०.८ किलो ड्रग्ज बाहेर निघाले.
विमानतळावर विदेशी महिलेजवळील बॅगांची एक्स-बीआयएस मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. तपासणीत महिलेच्या बॅगमध्ये छोट्या पुड्यांमध्ये संशय येण्यासारखे काहीतरी लपवल्याचे दिसून आले. यानंतर, महिलेजवळील ३ बॅगांची तपासणी करण्यात आली. बॅगमधील विविध पर्समध्ये ५०० ग्रॅम वजनाचे ड्रग्ज पॉलिथिन बॅगमध्ये लपवल्याचे आढळून आले. सर्व बॅगमधून जवळपास २०.८ किलो ड्रग्ज बाहेर निघाले.
नास्तोर फरिराय झिसो असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती झिम्बाब्वेची नागरिक असून दिल्लीहून युथोपिअन एअरलाईन्सच्या विमानाद्वारे ती अॅड्डिस अबाबामार्गे एनडोलाला जात होती. अटक केलेल्या महिलेल्या सीआयएसएफ आणि एनसीबीच्या हवाले करण्यात आले आहे. याप्रकरणी एनसीबीची अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत.