पणजी - येशू ख्रिस्ताच्या जन्म दिनाच्या उत्सवाला अर्थात नाताळाला आज मध्यरात्रीच्या प्रार्थनेने सुरवात करण्यात आली. गोव्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी स्थानिकांबरोबरच देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजधानी पणजीतील 'अवर लेडी ऑफ इमेक्युलेक कन्सेप्शन चर्च'मध्ये मंगळवारी 11.30 वाजता प्रार्थना सभेला कॅरल गायनाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर बायबलमधील उतारे वाचण्यात आले. रात्री 12 वाजता फादर वॉल्टर डीसा आणि सहकाऱ्यांनी बालक येशूच्या प्रतिमेला चर्चच्या समोर तयार केलेल्या गोठ्यात नेऊन ठेवले. त्याला प्रणाम करून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली.