बिहार -बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार असून सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) साथ सोडत लोकजन शक्ती पार्टी (लोजपा) स्वबळावर निवडणूक लढत आहे. रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी चिराग पासवान यांच्यावर येऊन पडली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये लोजपा एनडीएमधून बाहेर पडल्यामुळे भाजपाची कोंडी झाल्याचे म्हटले जात आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आघाडी धर्म पाळावा. त्यांनी माझ्यामुळे धर्मसंकटात पडू नये. नितीश कुमार यांना खूश करण्यासाठी माझ्या विरोधात बोलावे लागले. तर त्यांनी नि:संकोचपणे बोलावे, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.
चिराग पासवान यांनी आजटि्वट करत अप्रत्यक्षपणे नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी प्रचारामध्ये पूर्ण जोर लावला असून ते लोजपा आणि भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या संबंधाचे मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. वडील रुग्णालयात असताना, त्यांनी माझ्यासाठी जे केले, ते मी कधीच विसरू शकत नाही, असे चिराग पासवान म्हणाले.