महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Exclusive : चिनी सैन्याचा भारतीय प्रदेशात शिरकाव, लडाख विकास परिषदेचे नगरसेवक कोंचोक स्टॅन्झिन यांची पृष्टी - भारत चीन सीमारेषा वाद न्यूज

चिनी सैन्याने आपल्या प्रदेशात प्रवेश केला आहे आणि अद्याप माघार घेतलेली नाही. दोन्ही देशांमधील समस्यांमध्ये केवळ चर्चेतून तोडगा निघू शकेल, असा विश्वास चुशूल, लेह येथील कार्यकारी नगरसेवक कोंचोक स्टॅन्झिन यांनी यावेळी व्यक्त केला.

Etv bharat Bilal Bhat exclusive interview with Konchok Stanzin
Exclusive : चिनी सैन्य भारतीय प्रदेशात शिरले आहेत, लडाख विकास परिषदेचे नगरसेवक कोंचोक स्टॅन्झिन यांची पृष्टी

By

Published : Jun 8, 2020, 1:22 PM IST

चिनी सैन्य भारतीय प्रदेशात शिरले आहे आणि त्यांनी अद्याप माघार घेतलेली नाही, अशी पुष्टी चुशूल, लेह येथील कार्यकारी नगरसेवक कोंचोक स्टॅन्झिन यांनी जोडली. ते 'ईटीव्ही भारत'साठी बिलाल भट यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान, बोलत होते.

चीन आणि भारत या दोन्ही सैन्यांमध्ये शनिवारी झालेली कमांडर स्तरावरील चर्चा चुशूल, लडाख येथे पार पडली. स्टॅन्झिन हे लडाख स्वायत्त पहाडी कार्यकारी परिषदेचे चुशूल येथे प्रतिनिधित्व करतात.

लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पँगाँग आणि गलवान खोऱ्यातील फिंगर-४ परिसरात असलेल्या चराऊ कुरणांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रदेशात मे महिन्यात संघर्षास सुरुवात झाली असून, दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपले सैन्य अधिक बळकट केले आहे. या प्रदेशातील भटक्या विमुक्तांचे जीवनचक्र केवळ मंदावले नसून, अगदीच ठप्प झाले आहे.

कृषी क्षेत्रातील व्यवहार असोत वा बांधकामाची कामे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणाऱ्या गावांमधील दैनंदिन कामकाजावर या नव्याने सुरू झालेल्या संघर्षाचा अद्याप परिणाम झालेला नाही. मात्र, यावेळी चराऊ जमिनींविषयी अस्वस्थता व्यक्त करत ते म्हणाले की, 'सीमारेषेवरील गावांमधील रहिवाशांची ही लाईफलाईन आहे. येथे बहुतेक गावकरी हे पश्मिना शेळ्यांचे पालन करणाऱ्या भटके लोक आहेत.'

'प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेली एकूण सात गावे ही बफर झोन झाली आहेत, असे स्टॅन्झिन यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'या भटक्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत हा पशुपालन आणि पश्मिना आहे. हिवाळ्यामध्ये ते आपल्या गुराढोरांना चराऊ जमिनींवर घेऊन जातात. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळापासून या प्रदेश वादग्रस्त झाला आहे.'

या प्रदेशासाठी सैन्याची गस्त ही नेहमीचीच आहे. कधीकधी सैन्याची संरक्षकसाखळी (कॉर्डन) आणि शोध कारवाई सीएएसओ तासभर चालते. मात्र, गेल्या महिन्यात गावात तयार करण्यात आलेली संरक्षक साखळी ही गावकऱ्यांसाठी सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. मोठ्या प्रमाणावर गस्त आणि प्रखर सीएएसओमुळे या प्रदेशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

परिस्थितीची तीव्रता वाढल्यानंतर संपूर्ण प्रदेश वेगळा पडल्यामुळे गलवान खोऱ्यात किंवा फिंगर फोर भागात नागरिकांची हालचाल नसल्याचे स्टॅन्झिन यांनी सांगितले. चिनी सैन्याने आपल्या प्रदेशात प्रवेश केला आहे आणि अद्याप माघार घेतलेली नाही. दोन्ही देशांमधील समस्यांमध्ये केवळ चर्चेतून तोडगा निघू शकेल, असा विश्वास स्टॅन्झिन यांनी यावेळी व्यक्त केला.

लडाख प्रदेशात दोन्ही देशांमध्ये सीमांकन रेखा नाही. परिणामी, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राहणाऱ्या लोकांसाठी हा प्रदेश असुरक्षित झाला आहे. या लोकांच्या उपजीविकेचा स्त्रोत हा चराऊ कुरणे असून त्यावर चिनी सैन्य ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही स्टॅन्झिन म्हणाले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चराऊ कुरणांसंदर्भातील दावे सारखे बदलत राहतात. कधीकधी भारताकडून त्यांच्यावर दावा केला जाते आणि कधीकधी चीनही या कुरणांवर आपला दावा सांगतो. जोपर्यंत दोन्ही देशांमधील सीमांकन रेषा स्पष्ट केली जाणार नाही, या संघर्षावर कधीच तोडगा निघणार नाही, असे मत स्टॅन्झिन यांनी व्यक्त केले.

कधीकधी चिनी सैन्य भटक्यांच्या वेषात या चराऊ कुरणांमध्ये प्रवेश करते आणि या प्रदेशावर आपला दावा सांगतात. यावर स्टॅन्झिन यांनी असे सुचवले की, 'भारताने आपल्या देशातील भटक्या लोकांना चराऊ प्रदेशात मुक्त विहार करण्याची परवानगी द्यायला हवी जेणेकरुन आपल्याला वाटाघाटींसाठी कलम (प्लँक) तयार करता येईल. चराऊ प्रदेशात त्यांनी मुक्त विहार केल्यास भारताला चीनच्या हालचालींविषयी माहिती मिळवण्यास मदत होईल.'

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जे काही घडत आहे ते गावांपासून दूर घडत आहे. मात्र, स्टॅन्झिन यांच्या मते, सुमारे ११०० लोकसंख्या असलेली सात गावे प्रामुख्याने या सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळे थेट प्रभावित होत आहेत. हिवाळ्यापर्यंत या संघर्षावर तोडगा निघाला नाही, तर चीनला लागून असणाऱ्या लडाखच्या सीमेवरील रहिवाशांच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल, असे मत स्टॅन्झिन यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details