महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छिंदवाडा : गांधीजींनी जिथे असहकार चळवळीचा रचला पाया - non-cooperation movement

१९१४ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून परत आले. तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, १९२० मध्ये गांधीजींनी पहिल्यांदा नागपूरमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिथे असहकार चळवळीचा प्रस्ताव मांडला. आणि या अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर, ६ जानेवारी १९२१ला महात्मा गांधींनी छिंदवाडाला भेट दिली. यावेळी चिटनवीस गंज येथील एका सभेत त्यांनी असहकार चळवळीचे उद्दिष्ट आणि कारण जाहीर केले.

छिंदवाडा : गांधीजींनी जिथे असहकार चळवळीचा पाया रचला

By

Published : Aug 31, 2019, 5:03 AM IST

भोपाळ - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गांधीजींचे योगदान आपण सर्वच जाणतो. त्यामुळेच स्वातंत्र्यलढ्यादरम्यान गांधीजी जिथे जिथे गेले, त्या जागांना आपण राष्ट्रीय वारसा म्हणून जपतो.

छिंदवाडा : गांधीजींनी जिथे असहकार चळवळीचा पाया रचला

गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान मध्य प्रदेशचे १० दौरे केले. मध्य प्रदेशच्या तिसऱ्या भेटीत, ६ जानेवारी १९२१ ला गांधीजींनी छिंदवाडा येथे असहकार चळवळीचा पाया रचला.

१९१४ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेहून परत आले. तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना भारत भ्रमण करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, १९२० मध्ये गांधीजींनी पहिल्यांदा नागपूरमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिथे असहकार चळवळीचा प्रस्ताव मांडला. आणि या अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

यानंतर, ६ जानेवारी १९२१ला महात्मा गांधींनी छिंदवाडाला भेट दिली. यावेळी चिटनवीस गंज येथील एका सभेत त्यांनी असहकार चळवळीचे उद्दिष्ट आणि कारण जाहीर केले.

महात्मा गांधींचा त्याग आजही भारतीय लोक विसरले नाहीत. गांधीजींच्या मध्य प्रदेशशी जुळलेल्या अनेक आठवणी आहेत. आणि त्यामुळेच, मध्यप्रदेशातील कितीतरी गावांना तसेच खेड्यांना गांधीजींचे नाव दिले गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details