नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान हा भाग दशकांपासून भारताच्या ताब्यात आहे. गलवानवरून यापूर्वीपर्यंत कोणताही वाद यापूर्वी नव्हता. मात्र, चीनने शुक्रवारी रात्री गलवान ते श्योक भाग हा त्यांचा असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे भारत- चीन यांच्यातील अगोदरच एप्रिल 2020पासून ताणले गेलेल्या संबंधावर परिणाम होणार आहे. गलवानच्या मुद्द्यावर चीनने लष्करी कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेचा प्रस्ताव देखील भारतासमोर ठेवला आहे. गलवान व्हॅली परिसरात भारत आणि चीनने त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात सैन्य तुकड्या, लढाऊ विमाने जलदगतीने तैनात केली आहेत. भारतीय नौसेनेने पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील तुकड्यांना हाय अलर्ट राहायला सांगितल्यानंतर चीनचे गलवानच्या स्थितीबद्दलचे विधान समोर आले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी गलवानच्या प्रश्नावरून शुक्रवारी भारतावरच आरोप केले. गलवान व्हॅली हा भाग लाइन ऑफ अॅक्शन कंट्रोलपासून चीनच्या बाजूला आहे, असा दावा प्रवक्त्याने केला. चीनच्या सीमेवरील सैन्याच्या तुकड्या या भागात गस्त घालतात,असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही. तसेच भारताची कोणतीही चौकी त्यांनी घेतलेली नाही. भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेवर हल्ला करण्याची हिंमत केली त्यांना धडा शिकवला. चीनने लाइन ऑफ अॅक्शनवर भारतीय सैनिकांबाबत जे केले त्याबद्दल संपूर्ण देशसंतप्त असल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणतीही कठीण परिस्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत. सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला अधिकार दिले आहेत, असे म्हटले.
चीनच्या मालकीचे दैनिक ग्लोबल टाइम्सने पीएलएचा पश्चिम थिएटर कमांडर प्रवक्ता कर्नल झांग शुली याचे गलवान व्हॅली या भागावर चीनचे सार्वभौमत्व असल्याचे म्हटले होते. त्याच दिवशी ईटीव्ही भारतने गलवान व्हॅली मुद्द्याचे महत्व लक्षात घेऊन चीनने गलवान व्हॅलीवरून भारतासोबत नवीन वादाचा मुद्दा निर्माण केला असल्याचे म्हटले होते.
गलवान भागावर भारताचे दशकांपासून नियंत्रण आहे. लाइन ऑफ अॅक्शनपर्यंत नद्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंचवट्यावर आणि तटबंदीवर भारतीय सेना या भागात अखंडपणे आणि विनाअडथळा गस्त घालत आहे. मात्र, चीनने गलवान बाबत घेतलेली भूमिका आश्चर्यचकीत करणारी आहे, असे पत्रकार संजीव बारुआ यांनी म्हटले आहे. चीनने भारताला लागून असणाऱ्या 3488 किमी सीमेवरून अगोदरच अनेक वाद आहेत, त्यात गलवान व्हॅलीच्या मुद्द्याची भर टाकली आहे.
लेफ्टनंट जनरल दर्जाच्या दोन्ही देशांच्या कमांडर्समध्ये 6 जून रोजीझालेल्या बैठकीत, भारताने गलवान नदी ओलांडून गस्त घालणार नाही आणि बांधकाम करणार नाही, असे सांगितल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले. सोमवारी झालेल्या झटापटीबद्दल बोलताना भारतीय सैनिकांनी लाइन ऑफ अॅक्शन ओलांडली होती, असेही प्रवक्त्याने म्हटले. गलवानच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये दुसरी बैठक व्हावी, असे झाओ यांनी म्हटले आहे.
गलवान व्हॅली हा भारतासाच्या लष्करासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. भारत सीमांच्या सुरक्षेसाठी चिनी सीमांपासून एकदम जवळ रस्तेबांधणीचे काम करत आहे. या भागातील डोंगररांगातून भारत रस्तेबांधणी करत आहे. श्योक- दौलत बेग ओल्डी हे भाग भारतास रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असून तेथे रस्ते बांधणीचे आणि जोडणीचे काम चालू आहे. यातील गलवान व्हॅली परिसरातील मुख्य रस्त्यापासून बांधण्यात येणाऱ्या छोट्या-छोट्या रस्त्यांना चीनकडून आक्षेप घेण्यात येत आहे. हा भाग चीनच्या हद्दीतील असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, भारताचा याला विरोध आहे. चीन देखील लाइन ऑफ अॅक्शन जवळील भागात बांधकाम करीत आहे.