बीजिंग- चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारताचे नवीन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वांग यी म्हणाले, चीनमध्ये एस. जयशंकर यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पाहताना दोन्ही देशांत संबंध सुधारण्यासाठी चांगली कामगिरी केली होती.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना चीनकडून शुभेच्छा - चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी
डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैन्यात झालेला वाद सोडवण्यात एस. जयशंकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की एस. जयशंकर यांनी भारत-चीनमधील संबंधाच्या विकासासाठी सकारात्मक योगदान दिले आहे. दोन्ही देशांनी सहमतीनुसार हे संबंध विकसित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दोन्ही देशांतील विभिन्न क्षेत्रातील व्यावहारिक संबंधांना नवीन उंचीवर घेवून जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
एस. जयशंकर यांनी २००९ ते २०१३ पर्यंत बीजिंग येथे भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. डोकलाम येथे दोन्ही देशांच्या सैन्यात झालेला वाद सोडवण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.