नवी दिल्ली -भारत चीन सीमेवरील तणाव निवळण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. नुकतेच चीनने पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर आणखी 20 हजार सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे सीमेवर चिनी आणि भारतीय सैन एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. नियंत्रण रेषेवरील वाद निवळण्यासाठी चर्चा सुरु असतानाच चीनकडून अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
भारतीय सैनिक झिंजियांग प्रांतातील आणखी 10 ते 12 हजार सैन्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. चीनने या भागात अत्याधुनिक लष्करी वाहने आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे चिनी सैनिक भारतीय सीमेवर 2 दिवसांच्या आत पोहचू शकतात, अशा पद्धतीने थांबले आहेत.