भुवनेश्वर - खंडागिरी भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुलांनी प्लास्टिकपासून रोबोट तयार केला आहे. त्याचबरोबर अन्य नवीन वस्तूही तयार केल्या आहेत. मुलांच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी प्लास्टिकपासून तयार केले रोबोट
खंडागिरी भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मुलांनी प्लास्टिकपासून रोबोट तयार केला आहे. त्याचबरोबर अन्य नवीन वस्तूही तयार केल्या आहेत. मुलांच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वापरलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या यापासून मुलांनी रोबोट बनवला आहे. तसेच भंगारात मिळालेल्या प्लास्टिकपासून मुलांनी व्हॅक्यूम क्लीनर तयार केले आहे. त्याचा वापर घराची साफसफाई करण्यासाठी केला जातो. येथील मुले अशा नाविन्यपूर्ण गोष्टी करत असल्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.
प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होते. मात्र, खंडागिरी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी या प्लास्टिकचा योग्य वापर केला आहे. प्लास्टिकपासून रोबोट तयार करण्याच्या या कल्पनेमुळे मुलांचे कौतुक होत आहे. मुलांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर करुन पुढे जाण्याची आकांक्षा बाळगली आहे. मात्र, त्यांना पुरेसे आर्थिक पाठबळ नाही. भुवनेश्वरच्या उन्मुक्त फाउंडेशनच्या वतीने या मुलांना पाठबळ देण्यात आले आहे. यातील होतकरु मुलांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी उन्मुक्त फाउंडेशनच्या वतीने त्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे.