महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शंभर फूट खोल बोरवेलमध्ये पडला ५ वर्षीय मुलगा, बचावासाठी प्रयत्न सुरू

मुलगा काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाच्या घरी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार ५ वर्षीय रोहित आपल्या मामाच्या शेतात खेळण्यासाठी गेला होता. खेळतानाच अचानक तो बोरवेलमध्ये पडला. रोहितच्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल समजताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस, तहसीलदार आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

By

Published : Apr 20, 2020, 12:54 PM IST

शंभर फूट खोल बोरवेलमध्ये पडला ५ वर्षीय मुलगा
शंभर फूट खोल बोरवेलमध्ये पडला ५ वर्षीय मुलगा

जोधपूर- जिल्ह्यातील जोइन्त्रा गावात एक लहान मुलगा १०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला. मुलगा काही दिवसांपूर्वीच आपल्या मामाच्या घरी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार ५ वर्षीय रोहित आपल्या मामाच्या शेतात खेळण्यासाठी गेला होता. खेळतानाच अचानक तो बोरवेलमध्ये पडला.

शंभर फूट खोल बोरवेलमध्ये पडला ५ वर्षीय मुलगा

रोहितच्या कुटुंबीयांना या घटनेबद्दल समजताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ज्यानंतर पोलीस, तहसीलदार आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर, रुग्णवाहिका बोलावून मुलाला ऑक्सिजनचा पुरवठा सुरु केला गेला. बोरवेलमधून मुलाचा आवाजही ऐकू येत असून त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details