पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे. पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. यासाठी त्यांच्यावर विदेशातही उपचार झाले होते. त्यानंतर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात काही दिवस पर्रिकर दाखल होते. यानंतर त्यांना त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी हलवण्यात आले होते.
दरम्यान, 'गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर खूप आजारी आहेत. ते बरे होण्याची चिन्हे नाहीत,' असे उपसभापती आणि कलंगुटचे भाजप आमदार मायकेल लोबो यांनी म्हटले होते. 'काल रात्री पर्रिकरांची तब्येत खूपच बिघडल्याने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे सतत लक्ष ठेऊन आहेत. मात्र, ते कधी बरे होतील, हे सांगता येत नाही,' असे लोबो यांनी म्हटले होते.