रायपूर - कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता छत्तीसगड राज्याने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधणकारक केले आहे. कोरोनाचा प्रसार हवेतूनही होत असल्याने विविध राज्याने मास्क लावणे अनिवार्य केले आहे.
दिल्ली, पंजाबनंतर आता छत्तीसगडमध्येही तोंडाला मास्क लावणे अनिवार्य - कोरोना लाईव्ह न्यूज
दिल्ली, पंजाब राज्यातही तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली, पंजाब राज्यातही तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबईतही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता छत्तीसगड राज्यानेही घराबाहेर पडताना नागरिकांना मास्क घालणे बंधणकारक केले आहे. राज्यात 18 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून यातील 9 जण पूर्ण बरे झाले आहेत.
देशामध्ये आत्तापर्यंत 7 हजार 447 रुग्ण आढळून आले आहेत. तर 642 जण पूर्णत बरे झाले आहेत. मागील 24 तासात देशात 1 हजार 35 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 239 रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती आरोगय मंत्रालयाने दिली आहे.