छत्तीसगडमध्ये पिक-अप व्हॅनच्या अपघातात ८ ठार, १६ जखमी - chhattisgarh
'गाडीतील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने मद्यपान केले होते, असे समजले आहे. याविषयी अधिक चौकशी केली जात आहे. या अपघाताची एफआयआर नोंदवण्यात आली आहे,' असे सांगण्यात आले.
बलरामपूर - जिल्ह्यातील अमेरा गावात झालेल्या पिक-अप व्हॅनच्या अपघातात ८ जण ठार तर १६ जखमी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये ४ लहान मुलींचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास सुरुवात केली. अपघातात ७ जण जागीच ठार झाले तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्हॅनमध्ये लग्नाच्या वऱ्हाडातील ४० लोक होते. जखमींना अंबिकापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरगुजा यांनी अपघाताची माहिती दिली. 'गाडीतील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने मद्यपान केले होते, असे समजले आहे. याविषयी अधिक चौकशी केली जात आहे. या अपघाताची एफआयआर नोंदवण्यात आली आहे,' असे ते म्हणाले.