जगदलपूर : छत्तीसगड-ओडिशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत ७ माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील तिरिया माचकोट जंगलांमध्ये ही चकमक झाली. ठार झालेल्या माओवाद्यांवर एकूण ३२ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून माओवाद्यांचे मृतदेह आणि हत्यारे ताब्यात घेतली आहेत.
छत्तीसगड पोलिसांचे मोठे यश, चकमकीत ७ माओवाद्यांचा खात्मा
ठार झालेल्या माओवाद्यांवर एकूण ३२ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून माओवाद्यांचे मृतदेह आणि हत्यारे ताब्यात घेतली आहेत.
छत्तीसगड
२०१६ मध्ये बस्तर जिल्हा माओवादीमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना या भागात माओवादी हालचाली सुरू असल्याच्या सूचना मिळत होत्या. या माहितीच्या आधारे डीआरजी आणि एसटीएफद्वारे ही कारवाई करण्यात आली. नगनार ठाणे परिसरात ही चकमक झाली. बस्तरच्या पोलीस महानिरीक्षकांनी याविषयी माहिती दिली.
Last Updated : Jul 27, 2019, 7:10 PM IST