छतरपूर -मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील एका नामांकीत रुग्णालयात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने तिला व्हील चेअरची आवश्यकता होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने व्हील चेअर न दिल्याने त्या महिलेच्या मुलाला आपल्या आईला उचलून घ्यावे लागले.
मध्य प्रदेशातील जिल्हा रुग्णालयात घडला लाजीरवाणा प्रकार, वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष - वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष
मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील एका नामांकीत रुग्णालयात एक लाजीरवाणी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने तिला व्हील चेअरची आवश्यकता होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने तिला चेअर दिली नाही.
मध्य प्रदेशातील जिल्हा रुग्णालयात घडला लाजीरवाणा प्रकार
घरात पाय घसरुन पडल्याने अमित आपल्या वृद्ध आईला रुग्णालयात घेऊन आला होता. त्याच्या आईच्या पायाला दुखापत झाली होती. तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. अशा स्थितीत तो आईला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आला. त्याच्या आईवर उपचार केले. मात्र, घरी जाताना त्या वृद्ध महिलेला चालता येत नव्हते, तरीही रुग्णालय प्रशासनाने व्हील चिअर दिली नाही. अमितने रुग्णालय प्रशासनाला चिअर मागूनही त्यांनी दिली नाही. त्यामुळे अमितला आपल्या आईला उचलून घ्यावे लागले.