नवी दिल्ली - सोन्याची तस्करी प्रकरणाची प्रकरणे सतत समोर येत आहे. नुकतेच गाजलेल्या केरळ सोने तस्करी प्रकरणानंतर दुबईवरून आलेल्या 45 वर्षीय प्रवाशाला चैन्नई सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी ताब्यात घेतले आहे. संबंधित प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 460 ग्राम सोने जप्त केले आहे.
सोने तस्करी प्रकरणी प्रवाशाला अटक जप्त केलेल्या सोन्याची किंमत 24 लाख 10 हजार आहे. चैन्नई सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कलम 110 अंतर्गत सोने जप्त केले आहे. तर कलम 104 अंतर्गत प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.
सोने तस्करी प्रकरण -
3 फेब्रुवरीला चेन्नई विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून 'सीआयएसएफ' विभागाने 100-100 ग्रॅमचे 24 सोन्याचे बिस्कीट (गोल्ड बार) जप्त केले होते. जप्त केलेले सोने 2.4 किलो वजनाचे होते. तर त्याची किंमत 1 कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच 10 ऑक्टोबर 2020 रोजी चेन्नई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून 1.32 कोटी रुपये किमतीचे 2.88 किलोग्रॅम सोने जप्त केले होते.