नवी दिल्ली -देशामध्ये आपण लोकशाहीचा सण उत्साहात साजरा करत आहोत. त्या पार्श्वभूमिवर आपण आता तिसऱ्या टप्प्यात येऊन ठेपले आहोत. २३ एप्रिलला या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदार संघाचा त्यामध्ये समावेश आहे. आपणही जर या मतदार संघातील रहिवासी असाल आणि तुमच्या वयाची १८ वर्ष पूर्ण झाली असतील तर तुम्हीही मतदानासाठी उत्सुक असालच. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, की मतदार यादीत तुमचे नावच नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. मग उशीर कशाला, ही पद्धत वापरून आत्ताच तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे तपासा.
त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनएसव्हीपी) या वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी तुम्ही https://www.nvsp.in/ही लिंक आपले मोबाईल ब्राऊजर ओपन करून सर्च बारमध्ये टाकू शकता किंवा येथे क्लिक करूनही तुम्ही सरळ त्या साईटवर पोहोचू शकता.
या संकेत स्थाळावर भेट द्या या वेबसाईटवर आल्यानंतर साईटच्या वरील भागात डाव्या बाजुला असलेल्या 'सर्च योर नेम इन इलेक्टर रोल' या बटनवर टॅप किंवा क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक पेज ओपन होईल. तेथे तुम्ही दोन पद्धतींनी आपले नाव मतदार यादीत पाहू शकता.
नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा १ . ओळखपत्राच्या आधारावर
२. स्वतःचे नाव टाकून
ओळखपत्राच्या आधारावर मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तुमच्याजवळ व्होटर कार्ड असणे आवश्यक आहे. ओळखपत्राच्या आधारावर नाव सर्च करण्यासाठी तेथे विचारलेला तपशिल भरावा. तसेच जनरेट झालेला कोड ठरवून दिलेल्या तक्त्यात भरून तुम्ही आपले नाव पाहू शकता. तेथे तुमचा मतदार केंद्र क्रमांक आणि मतदार यादी क्रमांक दिलेला असेल.
व्होटिंग कार्डाच्या क्रमांकावरुन नाव शोधण्यासाठी येथे जा तुमच्याजवळ मतदार कार्ड नसेल किंवा कार्डाचा क्रमांक नसेल अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही दुसरा पर्याय वापरूनही आपले नाव मतदार यादीत तपासू शकता. त्यासाठी 'विवरण द्वारा खोज' या पर्यायावर जाऊन मागितलेला तपशिल भरावे लागेल. जर तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असेल तर तपशिल भरल्यानंतर तुम्ही तुमच्या मतदान केंद्रापासून तर यादीतील क्रमांकही सहज पाहू शकता.
स्वतःचे नाव टाकून मतदार यादीत नाव शोधण्यासाठी येथे क्लिक करा मतदार यादीत नाव असेल मात्र तुमच्याजवळ व्होटर कार्ड नसेल. तरी काळजी करण्याची गरज नाही. खालील कोणत्याही एका ओळख पत्र दाखवून तुम्ही आपले मत नोंदवू शकता.
- पासपोर्ट (पारपत्र)
- वाहन चालक परवाना
- छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र(राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
- छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
- पॅनकार्ड
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी(नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरअंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड)
- मनरेगा कार्यपत्रिका
- कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
- खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
- आधारकार्ड