मुंबई - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशाच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ च्या उड्डाणाची पूर्व चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारत पुन्हा एकदा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी २२ जुलैला चांद्रयान-२ चे उड्डाण होणार आहे. निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहाच वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. याच धर्तीवर ईटीव्ही भारतने चांद्रयान-१ योजनेत काम केलेल्या मक्बूल अहमद यांच्याशी चर्चा केली.
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ मक्बूल अहमद म्हणाले, क्रायोजेनिक इंजिनमध्ये आलेल्या बिघाडाला इतक्या लवकर दुरुस्त करता येईल, असे कधीही वाटले नव्हते. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सच्या पथकाचे कौतुक करावयास हवे. क्रायोजेनिक इंजिनातील लीक पहिल्यांदा छोटा आहे म्हणून सांगण्यात आला होता. परंतु, हे लीक पुन्हा मोठे निघाले. एका आठवड्यात याची दुरुस्ती करण्यात आले हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आता आपण चंद्राकडे जात आहोत ही भारतासाठी खूप मोठी उपलब्धता आहे.
चांद्रयान-२ मोहिमेबद्दल माहिती देतान अहमद म्हणाले, जीएसएलव्ही २०० ते २० हजार किलोमीटरच्या कक्षेत यानाला ठेवण्याचे काम करणार आहे. या कक्षेत पहिल्यांदा जोडणीचे काम होणार आहे. येथे पोहचण्यासाठी २० ते २२ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. या कक्षेत पोहचण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. याआधीही खूप वेळा या कक्षेत पोहचण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. परंतु, भारताकडील पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही या दोघांनीही आपली कामगिरी चोख बजावली आहे. एकदा जोडणी पार पडल्यानंतर कक्षेत वाढ करण्यात येणार आहे. लिक्वीड ऑपोजिव मोटारला (लॅम) फायर करुन कक्षा ४ वेळा कक्षा वाढवण्यात येणार आहे. यानंतर जवळपास एक आठवडा किंवा १० दिवसानंतर आपल्याला चंद्रावर पोहचण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज मिळणार आहे. पाचव्यावेळेस जेंव्हा कक्षा वाढवली जाईल त्यावेळी यान चंद्राजवळ पोहचणार आहे. यानंतर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करुन चंद्रावर पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याला जवळपास ५१ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यानंतर, आपण सुरक्षितरित्या चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत.