महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तांत्रिक कारणामुळे 'चांद्रयान'- 2 चे प्रक्षेपण थांबवले, लवकरच इस्रो नवीन वेळ जाहीर करणार - तांत्रिक त्रुटी

तांत्रिक कारणामुळे 'चांद्रयान'- 2 चे प्रक्षेपण थांबवले, लवकरच इस्रो नवीन वेळ जाहीर करणार

By

Published : Jul 15, 2019, 2:50 AM IST

Updated : Jul 15, 2019, 3:36 AM IST

02:48 July 15

चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार होते.

श्रीहरीकोटा- भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रोने पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे. चांद्रयान 2 मोहिमेच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन जवळपास 56 मिनिटांपूर्वीच थांबवण्यात आले होते. 15 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी भारताचे हे यान अवकाशात झेपावणार होते. मात्र, इस्रोच्या शास्त्रज्ञांना काही तांत्रिक त्रुटी लक्षात आल्या. त्यामुळे त्यांना ही मोहीम तात्पुरती स्थगित करावी लागली.

चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-2 अवकाशात झेपावणार होते.

लॉन्चिंग नंतर 52 दिवसांनी ‘चांद्रयान-2’ चंद्रावर पोहोचणार होते. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

Last Updated : Jul 15, 2019, 3:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details