नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र जारी केले आहे. इस्रोने हे चित्र आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. हे छायाचित्र चांद्रयान-२'च्या टेरिन मॅपिंग कॅमेरा -2 ने लिंडबर्ग क्रेटर जवळ टीपले आहे.
इस्रोची नेत्रदीपक कामगिरी, चांद्रयान-२ ने काढले चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र जारी केले आहे.
इस्रोची नेत्रदीपक कामगिरी
हे थ्रीडी छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटेकऱयांनी इस्त्रोचे कौतूक केले आहे. यापुर्वी देखील ईस्त्रोने अंतराळातून घेतलेल्या पृथ्वीचे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचे चित्र पाठविले होते.
नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान -२ मोहिमेनं देशभरामध्ये इस्रोची चर्चा झाली. या मोहिमेमध्ये जरी अडथळा आला असला तरी देशभरातून वैज्ञानिकांना पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेचं इस्रोचं कौतुक करण्यात आले.