नवी दिल्ली - भारताची महत्त्वपूर्ण चांद्रमोहीम चांद्रयान - २ अखेरच्या टप्प्यात आहे. चांद्रयान - २ मधून विक्रम लँडर विलग करण्याचा दुसरा टप्पा बुधवारी पहाटे यशस्वी झाल्याचे इस्रोने म्हटले आहे. येत्या शनिवारी ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ही माहिती दिली आहे.
चांद्रयान - २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम आहे. पहिल्या चांद्रयान मोहिमेत पाण्याचे रेणू सापडले होते. या मोहिमेत 'चंद्रावर क्षार, पाणी आहे का? कोणते वायू आहेत का? तेथे जीवनाची शक्यता आहे का? याच्या शक्यता पडताळल्या जाणार आहेत.