श्रीहरीकोटा- अख्या देशाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-2 मोहिमेचे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले. प्रक्षेपणाला 56 मिनिटे आणि 24 सेकंद राहिले असताना काउंटडाऊन थांबवण्यात आले. काही तांत्रिक कारणांमुळे इस्रोने हा निर्णय घेतला. त्यामुळे चांद्रयान 2 ची चंद्रावरची झेप लांबणीवर गेली आहे.
'चांद्रयान' 2 ची झेप लांबणीवर - date
पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयानाचे उड्डाण होणार होते. मात्र, क्रायोजिनिक इंजिनमध्ये इंधन भरताना काही तांत्रिक दोष आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने प्रक्षेपण थांबवण्यात आल्याचे इस्रोने सांगितले आहे.

रॉकेटमध्ये जेवढे इंधन भरण्यात आले होते ते खाली केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली आहे. रॉकेटमध्ये भरलेले सर्व इंधन खाली केल्यानंतर रॉकेट पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येईल. त्याची सखोल तपासणी केल्यानंतरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान आकाशात झेपावणार होते.