महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, धान्य खरेदी करा; सरकारची उद्योग समुहांना विनंती - फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स

देशभरात तयार शेतमाल आणि भाजीपाला खराब होण्यावरून कौर यांनी चिंता व्यक्त केली. फिक्कीच्या सदस्यांनी गहू, तांदूळ, फळे आणि भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन फिक्कीच्या सदस्यांना केले.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 29, 2020, 7:41 PM IST

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन केंद्र सरकारने बड्या उद्योगसमुहांना केले आहे. नाशवंत भाजीपाल्यासह धान्य खराब होऊ नये म्हणून कंपन्यांनी हा माल खरेदी करावा, त्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही, अशी विनंती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसीमरत कौर बादल यांनी कंपन्यांना केली.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत (फिक्की) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हरसीमरत कौर बादल यांनी हा मुद्दा मांडला. देशभरात तयार शेतमाल आणि भाजीपाला खराब होण्यावरून कौर यांनी चिंता व्यक्त केली. गहू, तांदूळ, फळे आणि भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन त्यांनी फिक्कीच्या सदस्यांना केले.

याबैठकीला फूड प्रोसेसिंग कंपन्यांचे उच्चपदस्थ उपस्थित होते. आयटीसी फूड, अमूल, कोका कोला, कारगिल इंडिया, कॅलॉग इंडिया, मॉन्डेलेझ इंटरनॅशनल, एमटीआर फुड्स, झायडस वेलनेस या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details