महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

. . . तर पाकिस्तानात जाणारे पाणी अडवून हरियाणा, पंजाबमध्ये वळवू - नितीन गडकरी

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी अडवून ते पंजाब हरियाणात वळवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.

नितीन गडकरी

By

Published : May 10, 2019, 3:55 PM IST

Updated : May 10, 2019, 7:34 PM IST

नवी दिल्ली- हरियाणा आणि पंजाबचा पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी अडवून ते पंजाब हरियाणात वळवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी हे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी संवाद साधत होते.

नितीन गडकरी

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, की हरियाणा आणि पंजाबसह विविध राज्यातील ६ प्रकल्पाचे काम अडून पडले आहे. ते सुरू करण्यात येईल. आमच्या हक्काचे ३ नद्यांचे पाणी पाकिस्तानात वाहून जाते, त्याला अडवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात जल आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. ते कमी करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असेल, असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रश्न - या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अजेंडा काय आहे?
उत्तर - आम्ही पाच वर्षात केलेल्या विकास कामांवर ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या राबवलेल्या योजना व विकास कामावर देशातील जनता समाधानी आहे. आम्ही देशात महामार्गाचे जाळे निर्माण केले आहे. आमच्या या कामावरच लोक आम्हाला मत देतील. विरोधी पक्ष हे आमच्या कामाबाबतचा खोटा प्रचार करत आहेत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल विरोधात अपशब्द वापरत आहेत.

प्रश्न - पाकिस्तानला जाणारे पाणी रोखू असे तुम्ही म्हणाला होतात. अशा पध्दतीच्या वक्तव्यामुळे तुम्हाला मते मिळवण्यास फायदा होईल का ?
उत्तर - पाकिस्तानचे वर्तन पाहून मी असे बोललो होते. जर त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, तर आम्ही धरण बांधून पाकिस्तानला जाणारे पाणी अडवू.

प्रश्न - ही निवडणूक म्हणजे खोटी विधाने (जुमला) करणे जातीचे समीकरण जुळवणे एवढ्यापर्यंत मर्यादित आहे का ?
उत्तर - विरोधी पक्षांकडे पाहिल्यास ते मोठी-मोठी आश्वासने देत आहेत. तसेच जनतेचे लक्ष खेचण्यासाठी युक्त्या वापरत आहेत. मी किंवा आमचा पक्ष अशा पध्दतीच्या प्रचाराचा आसरा घेत नाही.

प्रश्न - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर तुमच्या पक्षाने आरोप केले. हे आरोप चुकीचे असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.
उत्तर - हे पहा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी संदर्भ असतात. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. काहीवेळा त्यांच्या टीकेचा स्तर घसरलेला असतो. ते देशातील शक्तीशाली नेते आहेत.

प्रश्न - महाआघाआडी बद्दल तुमचे मत काय ?
उत्तर - त्यांनी सर्वात आधी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार हे जनतेला सांगावे. या महाआघाआडीत सर्वांनाच वाटते की ते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.

Last Updated : May 10, 2019, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details