हैदराबाद - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेलंगणाच्या एकदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. शाह पक्षाच्या सदस्य जोडणीच्या अभियानाचे उद्धाटन करण्यासाठी रंगारेड्डी जिल्ह्यात आले होते. यावेळी शाह यांनी राष्ट्रव्यापी सदस्य जोडणी अभियानाला सुरुवात केली.
अमित शाह यांनी रंगारेड्डी जिल्ह्याच्या भेटी दरम्यान ममदीपल्ली गावातील आदिवासी महिला जतवती सोनी यांच्या घरी जेवण केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी महिलेच्या घरी केले जेवण शाह एकदिवसीय दौऱ्यात तेलंगणा जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबत राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत. यासोबत शमशाबाद येथील केएससीसी मैदान येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेलंगणा राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली झाली नाही. त्यामुळे, तेलंगणामध्ये पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी अमित शाह जोर लावत आहेत.